जळगाव दूरदर्शन केंद्रातील विनय देवासे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव दूरदर्शन केंद्रातील विनय देवासे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव : Jalgaon

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवाशी तथा जळगाव दूरदर्शन केंद्राचे संचालक विनय मुन्नालाल देवासे (वय 57) यांचे आज (16 एप्रिल) दुपारी 1.05 वाजेच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर नागपूर येथील रॅडियन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

कोरोनाचा संसर्ग देवासे यांच्या फुफ्फूसापर्यंत पोहचला होता. तसेच त्यांना मधुमेहाचासुद्धा त्रास होता. त्यामुळे ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ते अन्न व नागरी पुरवठा विभागाचे माजी सहसचिव प्रदीप काळभोर यांचे चूलत बंधू होत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com