Video बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पारोळा - प्रतिनिधी Parola

तालुक्यातील तामसवाडी (Tamswadi) येथील (Bori) बोरी मध्यम प्रकल्प हा  शंभर टक्के भरल्याने या धरणाचे १५ दरवाजे सकाळी चार च्या सुमारास  २६७,१९ मिटरने उघडण्यात आले आहेत, एकुण जिवंत साठा हा १०० टक्के झाला असल्याची माहिती व्ही.एम.पाटील यांनी दिली आहे.

सदर मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग होत असल्याने व त्यात तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने बोरी नदीला महापुरु आल्या सदृश्य परिस्थिती दिसत आहे,बोरी दुथळी भरुन वाहत आहे, यामुळे बोरी धरणाच्या खालील भागाती नदी काठच्या गावा मधील नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

नदी पात्रामध्ये कोणीही जाऊ नये अथवा आपली गुरेढोरे नेऊ नये जिवित व वित्त हाणी टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहान तहसीलदार अनिल गवांदे,पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यात मुसळदार पाऊस

पारोळा तालुक्यात काल दि,३१ रोजी मुसळदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत रात्री तालुक्यात सर्वी कडे जोरदार पाऊस झाले असल्याची माहिती मिळत आहे.

आढावा बैठक

पारोळा तालुक्यातील बोरी नदी काठच्या सर्व गावातील तलाठी, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांची आज दि,१ बुधवार रोजी आढावा बैठक प्रांत विनय गोसावी एरंडोल यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

Video बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले
मंदिरे बंद, पण व्हिआयपींसाठी सुरु

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com