ओळखीचा गैरफायदा घेत पतीच्या मित्रानेच लुटली विवाहितेची आब्रु

मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ व फोटो, चाळीसगाव पोलीस स्टेशनाल गुन्हा दाखल
ओळखीचा गैरफायदा घेत पतीच्या मित्रानेच लुटली विवाहितेची आब्रु

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहरातील एका २२ वर्षीय विवाहितेला मोबाईलमधील काढलेले फोटो व व्हिडिओ डिलिटी करण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी बोलवून, पतीच्या मित्रांनेच ओळखीचा गैरफायदा घेवून विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना काल रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील घाटरोड स्थिती पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या एका २२ वर्षीय विवाहितेचा पती भंगार व्रिकाचा व्यवसाय करतो. पतीचा मित्र निजाम शेख जकीउद्दीन मुजावर हा अविवाहित असून तो नेहमीच घरी येत असल्याने, गेल्या दोन वर्षापासून पिडीत महिला त्याला ओळखत होती.

याच ओळखीचा गैरफायदा घेवून, त्याने पिडीताचा मोबाईल नंबर मिळवला व नेहमीच तिच्याशी तो बोलत असे. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांने पिडीताचे फोटो व व्हिडिओ देखील काढुन ठेवले होते. दि,२९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीता पती घरी नसताना, त्याने तिला फोन केला व तुझ्या हाताने मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ काढले असल्याची धमकी दिली. तसेच ते तुझ्या हाताने डिलिट कर असे सांगून शहरातील घाटरोड नवीन पाण्याच्या टाकीमागे शेतात मोकळ्याजागी बोलवले.

पिडीता त्यांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून त्याने बोलवल्या ठिकाणी गेली, त्या ठिकाणी निजाम शेख जकीउद्दीन मुजावर एकदाच उभा होता. पिडीताने त्यांच्याकडे मोबाईल मागीतला, परंतू त्याने तो दिला नाही. मोबाईल न दिल्यामुळे ती परत घरी येण्यासाठी निघाली असता, त्याने तिच्यासोबत अतिप्रसंग केला. पिडीता घरी जाण्यासाठी निघाली असता, तितक्यात पिडीताचा पती त्याठिकाणी पाहेचला, पिडीताने घडलेली हकीगत, पतीला सांगीतल्यानतंर, दोघांनी चाळीसगाव पोलीस स्टेशन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याप्रकरणी पिडीताच्या फिर्यादीवरुन नजाम शेख जकीउद्दीन मुजावर रा.कादरीनगर,चाळीसगाव यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com