अलायंस मराठी चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त विविध कार्यक्रम

नाताळवर कोणाचे सावट : अनेक कार्यक्रम रद्द
अलायंस मराठी चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त विविध कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

यावर्षीच्या ख्रिस्त जन्मोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी येथील आलायंस मराठी चर्चमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करून गर्दी न करता विविध कार्यक्रमांचे आयोजन साध्या पद्धतीने करण्यात येत आहेत.

यात ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त २१ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २१ रोजी चर्च स्वच्छता तरूण संघाच्या सदस्यांनी केली. २३ रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत कॅरल सिंगिंग. २४ रोजी सायं. ४ ते ६ वा. व सायंकाळी ७ वाजेपर्यंत खाऊ वाटत ख्रिस्त जन्मोत्सव पूर्वसंध्या विशेष उपासना तरूण संघ व चर्चचे सभासद, पास्टर स्वप्निल नाशिककर करणार आहे. २५ रोजी सकाळी ९ वाजता ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना प्रेमचंद जाधव करणार आहे. २६ रोजी दुपारी बारा वाजता विविध खेळ व स्पर्धा चर्च परिसरात होतील. २७ रोजी सकाळी ९ व सायंकाळी ६ वाजता प्रभुवर विशेष उपकार स्तुति उपासना व संडे स्कूल कार्यक्रम पास्टर स्वप्नील नाशिककर अनिता खांडेकर, प्रतिभा वाघमारे, रीना सिंग, संगीता निर्मल या करतील. २८ रोजी सकाळी ९ वाजता निबंध स्पर्धा. २९ रोजी सकाळी ९ वाजता चित्रकला स्पर्धा. ३० रोजी सायं. ७ वाजता चर्च परिसरात स्नेहभोजन, ३१ रोजी रात्री ९ वाजता भजन व वॉच नाईट सर्विस आयोजन चर्च परिसरात होणार आहे. १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता नवीन वर्ष विशेष उपासना व प्रभु भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजबांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पास्टर स्वप्निल नाशिककर, चर्च अध्यक्ष प्रवीण मोहोळ, सेक्रेटरी फिलिप फ्रान्सिस, खजिनदार प्रेमचंद जाधव, पंच जया फ्रान्सीस मनी, प्रवीण जाधव, अनिता रवंदळेकर, प्रतिभा वाघमारे, संगीता निर्मल, रीना सिंग, सॅमसन गायकवाड, सुनील सिंह यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com