भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

वरणगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक वंचित सर्व जागा स्वबळावर लढणार अशी घोषणा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केली.

वरणगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वरणगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी वरणगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक वंचित सर्व जागा स्वबळावर लढणार अशी घोषणा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केली.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा महासचिव दिनेश इखारे,संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष, जितेंद्र सुरवाडे तालुका सचिव, गणेश इंगळे तालुका सचिव, प्रमोद बावस्कर, बालाजी पठाडे, देवदत्त मकासरे, रवी मोरे, रुपेश कुऱ्हाडे, राहुल गवई, शांताराम सुरवाडे, संजय सुरवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.