लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा , लसीचा तुटवडा

लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा , लसीचा तुटवडा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अठरा वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहे. तरुणाईचा लसीकरणासाठीचा उत्साह बघता शहरात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

यामुळे रविवारी शहरातील महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकार्‍यांनी दिली.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांसह सफाई कामगार व डॉक्टरांचे लसीकरण्यात आले. त्यानंतर पोलिस कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

तिसर्‍या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले असून त्यानंतर आता अठरा वर्षावरील सर्वांचेच लसीरकणाची मोहीम राबविली जात आहे. राज्यासह केेंद्र शासनाकडून जिल्ह्यात लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात आहे.

तसेच लसीकरणासाठी नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्साह असून सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर नागरिक गदी करीत असल्याने लांबच लांब रांगा लावत आहे. तसेच या आठवड्यात शासनाकडून जळगाव मनपासाठी सुमारे 10 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता.

अवघ्या काही दिवसात हा साठा संपला असून आता मनपाकडे लसीचा साठा शिल्लक नाही. त्यामुळे रविवारी 4 जुलै रोजी मनपाचे सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकार्‍यांनी दिली.

लसीकरणासाठी रांगा

शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर आनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणार्‍यांचे लसीकरण केले जात आहे. लसीसाठी सकाळपासून नागरिक रांगेत नंबर लावत असल्याने सकाळपासून लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

शिवाजी नगरातील केंद्रावर गोंधळ

लसीकरणाठी नागरिकांची लसीकरण केंद्रार गर्दी होत आहे. यातच शहरातील शिवाजी नगरातील मनपाच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज दुपारच्या सुमारास गर्दी झाल्याने नारिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या लसीकरण केंद्रावर या आठवड्यात दोन वेळा गोंधळ झाला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com