जिल्ह्यात लसींचा तुटवडा

दुसर्‍या डोसला दिले जाते प्राधान्य; नागरिकांना लसीची प्रतीक्षा
जिल्ह्यात लसींचा तुटवडा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

देशभरात कोरोनाच्या लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. परंतु लसीचे उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याने सर्वत्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला असून मोजक्याच केंद्रांवर दुसरा डोस घेणार्‍यांचेच लसीकरण केले जात आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सर्वच राज्यातील नागरिकांना लसीकरण केले जात असून महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते.

परंतु लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने तसेच लसींचा तुटवडा निर्माण होत असून ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळत बसावे लागत होते. काही दिवसांपासून 18 ते 44 पर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनावरचा भार कमी झाला असून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यातही केवळ दुसरा डोस दिला जात आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीचा पुरवठाच झालेला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्र बंद असल्याचे चित्र त्याठिकाणी दिसून येत आहे.

जळगावातील आज सर्व लसीकरण केंद्र बंद

शासनाकडून लसींचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात लसींचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. लस उपलब्ध नसल्याने उद्या 18 मे रोजी जळगाव शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अन् पुन्हा लागला लसीकरणाला ब्रेक

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कोव्हॅक्सीनचे 2 हजार 300 डोस प्राप्त झाले होते. परंतु अवघ्या दोन दिवसात हे डोस संपले. आता पुन्हा लसीकरणाला ब्रेक लागला असून प्रशानाकडून लसी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com