चारचाकीच्या चोरीसाठी रुग्णवाहिकेचा वापर

चारचाकीच्या चोरीसाठी रुग्णवाहिकेचा वापर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेतून Ambulance येत चारचाकी four wheeler चोरीचा theft प्रयत्न करणार्‍या दोन संशयितांना रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलिसांनी Jalgaon city police अटक arrested केली आहे.

योगेश संजय बाजड वय 23 रा.गेंदालाल मील व दिनेश शिवदास राठोड वय 24 रा.वाघनगर जळगाव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून गुन्हा करतांना वापरलेली रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे.

भुसावळ येथील कुणाल रामदास हटकर हे जळगावातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या छाबडा सर्जिकल दुकानात काम करतात. हटकर हे ऑफिसच्या कामानिमित्त दि.25 रोजी स्वतःची चारचाकी क्रमांक एमएच.19.बीजे.0554 ही गोल्ड सिटी हॉस्पिटलसमोर लावून इंदोर येथे गेले होते.

रात्रीच्या वेळी क्रमांक एमएच.24.सी.6871 या रुग्णवाहिकेतून आलेल्या दोघांनी चारचाकी चोरी करण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. याप्रकरणी कुणाल हटकर यांनी शहर पाोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात येवून संशयित निष्पन्न करण्यात आले.

रुग्णवाहिकाही केली जप्त

दोघेही संशयित रविवारी सायंकाळी बसस्थानक परिसरातील भजे गल्लीत असल्याची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, राजकुमार चव्हाण यांच्या पथकाने योगेश बाजड व दिनेश राठोड या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कुणाल हटकर यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येवून रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेचा मालक मलकापूर येथील असल्याचे समोर आले असून गुन्ह्यात रुग्णवाहिकेचा वापर कशासाठी करण्यात आला, यासह इतर बाबींचा तपास सुरु आहे. पुढील तपास संतोष खवले हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com