बेशिस्त पार्किंग करणाऱ्या 40 वाहन धारकांवर कारवाईचा बडगा

वाहतूक शाखेची कारवाई
बेशिस्त पार्किंग करणाऱ्या 40 वाहन धारकांवर कारवाईचा बडगा

जळगाव : jalgaon

मुख्य रस्त्यावर main road बेशिस्त पार्कींग Unruly parking करणार्‍या वाहनचालकांवर City Transport Branch विभागाकडून कारवाईची Action मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज दिवसभरात ४० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून १० हजार रुपये दंड Penalty वसूल करण्यात आला आहे.

शहरात बेशिस्त पार्कींगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मुख्य रस्त्यावरव नागरिक बेशिस्तपणे वाहने पार्कींग करीत असल्याने सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच अतिक्रमण धारकांकडून देखील रस्त्यावर दुकाने थाटली जात असल्याने ते देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शुक्रवारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, कैलास पाटील, संजय नाईक, दीपक पाटील, दीपक महाजन, योगेश पाटील, मदन पावरा, किरण उगले, सोपान मराठे या कर्मचार्‍यांच्या पथकाने जूने सानेगुरुजी रुग्णालय ते कोर्टचौकापर्यंत कारवाई केली.

१० हजाराचा दंड वसूल

बेशिस्त पार्कींगसह नो पार्कींगमध्ये वाहने लावणार्‍यांवर कारवईचा बडगा उगारण्यात आला. यात पहिल्याच दिवशी ४० वाहनांवर कारवाई करण्यता आली. तसेच त्यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपये दंड देखील वसुल करण्यात आला असून ही कारवाई आत दररोज केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com