वाहने स्क्रॅब करणारी अनधिकृत 11 दुकाने जमीनदोस्त

वाहने स्क्रॅब करणारी अनधिकृत 11 दुकाने जमीनदोस्त

अयोध्यानगरात कारवाईला विरोध; उपायुक्त संतोष वाहुळेंचा दणका

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अयोध्यानगरातील मनपाच्या जागेवर जवळपास 15 ते 20 हजार स्वेअर फुटावर बेकायदेशिररित्या वाहनांचे स्क्रॅब करणारी दुकाने उभारण्यात आली होती.

याबाबत लोकशाही दिनात तक्रार प्राप्त झाल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधीतांना नोटीस बजावली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी मनपाच्या पथकाने जेसीबीच्या माध्यमातून अनधिकृत 11 दुकाने जमीनदोस्त केली आहे.

महापालिकेच्या जागेवर असलेले अनधिकृत दुकानांबाबत लोकशाही दिनात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेवून मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रम अधीक्षक इस्माईल शेख, संजय ठाकूर, किशोर सोनवणे आणि पथक कारवाईसाठी गेले होते.

मात्र या कारवाईला विरोध करत, वाद घातल्यानंतर उपायुक्त वाहुळे यांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार जेसीबीच्या सहाय्याने 11 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

अतिक्रमणधारकांनी घातला वाद

महापालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता, संबंधीत अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत, मनपाच्या पथकासोबत वाद घातला.

मनपाने जागा घेतली ताब्यात

अयोध्या नगर परिसरात अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करुन, जवळपास 15 ते 20 हजार स्वेअर फूट एवढी जागा मनपाने ताब्यात घेतली आहे. या जागेवर महानगरपालिकेचे बोर्ड लावण्यात येणार असून, लवकरच संरक्षण भिंत बांधली जाणार असल्याची माहिती, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com