समांतर रस्त्यांसाठी जून 2021चा अल्टिमेटम
जळगाव

समांतर रस्त्यांसाठी जून 2021चा अल्टिमेटम

Balvant Gaikwad

पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व या विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणकडे हस्तांतरीत झालेल्या आशीयाई महामार्गाचे तसेच जळगाव शहरातून जाणार्‍या समांतर रस्त्याचे काम बर्‍याच दिवसांपासून रखडले होते ते लवकार मार्गी लागणार आहे. यात शहरातून जाणार्‍या महामार्गावर तीन ठिकाणी अंडर पास वे तर 1 पादचारी अंडर पास वे यांची निर्मिती प्रस्तावीत असून समांतर रस्त्यांच्या पूर्णत्वासाठी जून 2021अखेर पर्यत मुदत देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या सुत्रांनी दिली आहे.

महामार्ग विस्तारिकरणाच्या कामास येणार गती, अ‍ॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर – झंडूमार्फत कामेआज अमरावती अकोला,बुलढाणा,जळगाव, धुळे अशा तीन ते चार जिल्हयातून जाणारा पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6व आताचा आशीयाई महामार्गाचे काम गेल्या काही वर्षापासून रखडले होते. चिखली ते नवापूपर्यंतचे काम तीन टप्प्यात करण्यात येत असून त्यात चिखली ते तरसोद 67 कि.मी.तरसोद ते फागणे 87 कि.मी व फागणे ते नवापूर असे तीन ते चार टप्पे असून पूर्वी बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर देण्यात आले होते.

जळगाव जिल्हयातून जाणारा राष्टीय महामार्ग क्रमांक 6चे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी ठेकेदाराच्या आर्थीक तरतुदीमुळे बंद होते. ते आता नव्याने आता बीओटी ऐवजी हायब्रीड अ‍ॅन्युइटी तत्त्वावर चौपदरीकरणाच्या कामाला नव्याने प्रारंभ होणार आहे.

या कामांचा खर्च 40 टक्के केंद्र शासन, तर 60 टक्के कंत्राटदार कंपनी करणार महामार्गाचे काम सुटसुटीत व दर्जेदार होण्यासाठी 50 ते 60 कि.मीचे टप्पे करण्यात आले आहेत. यात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी अर्थात नही अंतर्गत केले जात आहे. केंद्र शासनाकडून हायब्रीड अ‍ॅन्युइटी तत्त्वामध्ये चौपदरीकरणाच्या कामामध्ये 40 टक्के केंद्र शासन, तर 60 टक्के कंपनी खर्चाचा वाटा उचलणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडथळ्यांचे ग्रहण लागलेल्या पुर्वीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व आताचा आशीयाई महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

समांतर रस्त्यांचेदेखील काम मार्गी

गेल्या काही वर्षापासून ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे पूर्वीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व आताचा आशीयाई महामार्गाच्या चौपदीकरणासह विस्तारीकरण कामाचे कंत्राट अ‍ॅग्रो इन्फास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनी करीत असून जळगाव शहर व समांतर रस्त्याचे काम झंडू कन्स्ट्रक्शन कंपनी (जेसीसी)करीत आहे. शहरांतर्गत कालिंकामाता मंदिर ते खोटेनगर या 7.756 कि.मिटर दरम्यान प्रभात चौक,गुजराल पेट्रोल पंप आणि दादावाडी अशा तीन ठिकाणी वेइकल अंडरपासवे (व्हीयुपी)तर अग्रवाल हॉस्पीटलसमोर पादचार्‍यांसाठी (एफयुपी)अशी पुलांची कामे करण्यात येणार आहेत. शहराजवळून जाणार्‍या महामार्गालगतच असलेल्या समांतर रस्त्यांतर्गत करण्यात येणारी कामे इंजीनिअर प्रोक्युरमेंट मोडवर करण्यात येणार असून या कामांसाठी जुन 2021 पर्यत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या अधिकारी सुत्रांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com