शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी पद्धत बंद
जळगाव जि.पJalgaon ZP

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी पद्धत बंद

‘युडायस’ प्रणालीमुळे शाळा अनधिकृततेचा मार्ग मोकळा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यासह राज्यातील ज्या शाळांना मान्यता क्रमांक व युडायस प्रणाली क्रमांक लागू करण्यात आलेला असल्यानेे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे त्याची नोंदणी झालेली आहे.

अशा शाळांचा अनाधिकृततेच्या मार्ग मोकळा झाला आहे. तसेच राज्यांतर्गत शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची प्रतिस्वाक्षरी पद्धत बंद करण्याचा निर्णय झाला असल्या जी.आर.महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉ. सुवर्णा खरात काढला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात अथवा राज्यातील इतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी सीबीएसइ, आयजीसीएसई, आयबी या मंडळातील शाळांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळातील संलग्नीत शाळेतून अन्य मंडळाच्याशी संलग्नीत शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास सध्या प्रचलित असलेल्या कार्यपद्धतीनुसार शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी आहे.

ही पद्धत केवळ ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना दाखले दिले आहेत. ती शाळा अधिकृत व मान्यता प्राप्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी होती.

शासन निर्णय 19 सप्टेंबर 2016 अन्वये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर शाळा मान्यता क्रमांक व युडायस प्रणाली क्रमांका याचा उल्लेख असल्यामुळे शाळांच्या अनाधिकृततेचा प्रश्न निकाली निघाला आहे.

तसेच शाळा सोडल्याच्या दाखला हा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केला असल्यामुळे त्यावर पुन्हा प्रतिस्वाक्षरीची गरज नाही. हे लक्षात घेवून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरीची पद्धत बंद करण्यात आली आहे.

हा शासन निर्णय सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू राहील. शासनाच्या संकेत हा आदेश उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढलेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com