ग.स.च्या सहकार गटाची धुरा उदय पाटलांच्या खांद्यावर

सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी निवड : गटनेतेपदी ज्येष्ठ संचालक अजबसिंग पाटील यांची वर्णी
ग.स.च्या सहकार गटाची धुरा उदय पाटलांच्या खांद्यावर

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील नावाजलेल्या सहकारी कर्मचार्‍यांच्या ग.स.सोसायटीच्या सहकार गटाची एमआयडीसी परिसरातील एका लॉनवर आज रविवारी सभा झाली. या सभेत सहकार गटाच्या अध्यक्षपदी उदय पाटील तर गटनेते पदी ज्येष्ठ संचालक अजबसिंग पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष उदय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

एमआयडीसी परिसरातील एका लॉनवर आज रविवारी दुपारी सहकार गटाची मावळते अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली सभा पार पडली. या सभेस माजी चेअरमन एस. एस. पाटील, व्ही झेड पाटील, झांबर राजाराम पाटील , उत्तमराव पाटील, रमेश निकम , जे के पाटील, सुमन पाटील, आर.एच.बाविस्कर, शिवाजी पाटील, रमेश शिंदे, दत्तू कोल्हे, अनिल बाविस्कर, राजेश पवार तसेच संचालक कैलासनाथ चव्हाण, भाईदास पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विक्रमादित्य पाटील, विद्यादेवी पाटील, रागिनी चव्हाण आदी उपस्थित होते.

वाढत्या वयोमान व प्रकृती अस्वास्थ्यामुळे मावळते अध्यक्ष बी.बी.पाटील यांनी अध्यक्षपदासाठी उदय पाटील तसेच गटनेतेपदी अजबसिंग पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव उपस्थित आजी माजी संचालकांकडे मांडला. त्यास सर्व सहकार गटातील सदस्यांनी एकमताने मान्यता दिली. त्यानुसार सभेत सर्वानुमते उदय पाटील यांची अध्यक्षपदी तर गटनेतेपदी अजबसिंग पाटील यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांचा मावळते अध्यक्ष बी.बी. पाटील यांच्यासह ज्येष्ठ संचालकांतर्फे करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com