पाचोरा : दुचाकी चोरीप्रकरणी दोन तरुणांना अटक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
पाचोरा : दुचाकी चोरीप्रकरणी दोन तरुणांना अटक

जळगाव | प्रतिनिधी

संत मीराबाईनगरातून मोटारसायकल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातील दोन संशयित तरुणांना पकडले आहे.

संत मीराबाईनगरातील रहिवासी आणि जलसंपदा विभागामधील कनिष्ठ लिपीक किसन नामदेव जगताप यांची टीव्हीएस ज्युपीटर (क्र.एमएच १९ सीके ९००५) ही दुचाकी १९ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराजवळून चोरट्यांनी लांबवली.

या दुचाकी चोरीची घटना २० रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत किसन जगताप यांनी फिर्याद दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेतील संशयित चोरांबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाली. या पथकाने पाचोरा तालुक्यातील निभोंरी येथील संशयित आरोपी संदीप बापूराव चव्हाण (वय ३०) आणि चिंचपुरा येथील गोकुळे रामदास राखपसरे (वय २७) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघं चोरट्यांकडून दुचाकी हस्तगत केली. दोघं आरोपींना तपासकामी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com