जळगावातील दोन तरुण पाल धरणात बुडाले

जळगावातील  दोन तरुण पाल  धरणात बुडाले

जळगाव : jalgaoon

पर्यटनाला tourism गेलेले जळगाव शहरातील दोन तरुण Tarun पाल Pal येथील धरणात In the dam बुडाल्याची Drowned घटना रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.

उज्ज्वल राजेंद्र पाटील वय २३ रा.विनायक नगर खेडी व जयेश माळी वय २४ रा. वाघनगर अशी मयतांची नावे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत दोघांचेही मृतदेह मिळालेले नव्हते. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली जाणार आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असेकी उज्ज्वल पाटील याचा ५ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासह पर्यटनासाठी उज्ज्वलसह वाघनगर येथील जयेश व इतर काही मित्र रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पाल येथे गेले होते.

पाल येथील धरणात पाण्यात खेळत असताना जयेश हा बुडायला लागला. उज्ज्वल त्याला वाचवण्यासाठी गेला असता दोघेही धरणात बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यावर या ठिकाणी धरणात रात्री अकरा वाजेपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली मात्र दोघांचे मृतदेह मिळून आले नाही. सोबतच्या मित्रांमुळे दोन जण बुडाल्याची घटना जळगावात वाऱ्यासारखी पसरली. सोमवारी सकाळी पुन्हा पाल येथील धरणात शोधमोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

खेडी येथील तरुण बुडाल्याच्या वृत्तास एमआयडीसी पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे. हा तरुण एका वित्तीय संस्थेत वसुलीचे काम करतो तर त्याचे वडील ऑटोमोबाईल क्षेत्रात कामाला आहेत. तर जयेश हा तरुण काही दिवसांपासुन घरीच असल्याची माहिती मिळालीय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com