अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला जागीच ठार

मॉर्निंग वॉकला जाताना घडली घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला जागीच ठार

प्रा.यशवंत पवार

नांद्रा ता.पाचोरा - Pachora

सामनेर येथे आज दि.४ रोजी सकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेश दारासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वाक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच ठार झाले.

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील महिला नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज पुरुष व महिला सकाळी मॉर्निंग साठी जात असतात यावेळी सकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनीषा साहेबराव पाटील (वय 50), अनिता शहादु पाटील (वय 48) या दोघी महिला मॉर्निंग वॉक करून परत असताना अज्ञात इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच गतप्राण झाल्या. अपघात एवढा जोरदार होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला पेकल्या गेल्या दुसरी महिलेस 50 मीटर फरफटत नेले दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.

घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल मोरे, पो.हवा.रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com