<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>जिल्ह्यातील एरंडोल शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल फाऊंटन जवळ दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात माय लेकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.</p>.<p>जि.प.शाळेच्या शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी (वय ३५) रा.विद्यानगर एरंडोल व मुलगा लावण्य कृष्णकांत चौधरी वय १० हे दोघ मायलेकं दुचाकी क्र.एमएच १९-डीबी ८७७९ ने रोज मुलाला घेवून शाळेत जात असत. आज सकाळी सुध्दा दोघंजण जात असताना ट्र क्र.जी.जे. २६ टी ८२६४ ने धडक दिल्याने यात दोघं माय लेकाचा मृत्यू झाला. घटनास्थळी पो.नि.ज्ञानेश्वर जाधव, सपोनी तुषार देवरे, अकिल मुजावर, संदीप सातपुते, मिलींद कुमावत आदींनी जावून पुढील कार्यवाही केली.</p>