जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात आज 11 फेब्रुवारी रोजी नव्याने 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 हजार 467 एवढी झाली आहे. तसेच आज सलग तिसर्या दिवशी दोन बाधितांचा मृत्यू झाला असून 23 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील अठरा केंद्रावर 564 आरोग्य कर्मचार्यांनी लस टोचून घेतली.

जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, भुसावळ, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 729 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 366 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 22, अमळनेर 1, एरंडोल 1, रावेर 2, पारोळा 1, चाळीसगाव 2 असे एकूण 29 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दिवसभरात भुसावळ व बोदवड तालुक्यातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 564 जणांनी घेतली लस

जिल्ह्यातील अठरा केंद्रावर आज लसीकरणाची मोहिम पार पडली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 64, जामनेर 7, चोपडा 24, मुक्ताईनगर 9, चाळीसगाव 37, पारोळा 5, भुसावळ 24, अमळनेर 16, पाचोरा 35, रावेर 35, यावल 36, डी. बी. जैन रुग्णालय जळगाव 87, गोल्डसिटी जळगाव 56, भडगाव 10, बोदवड 12, एरंडोल 36, भुसावळ रेल्वे हॉस्पीटल 28, ऑर्कीड हॉस्पीटल 43 असे एकूण 564 जणांनी लस टोचून घेतली. आतापर्यंत 12 हजार 765 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याचे शल्यचिकीत्सकांनी सांगितले.