Cyclone Tauktae : वादळात झाड कोसळून दोघं बहिणींचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथील घटना
Cyclone Tauktae : वादळात झाड कोसळून दोघं बहिणींचा मृत्यू
USER

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

शहरासह तालुक्यात झालेल्या वादळी पावसामूळे तालुक्यातील अंचलवाडी येथे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून एक झोपडी दाबली गेली त्यात सालदारकी करणाऱ्या कूटूंबातील दोन पावरा समाजाच्या बहिणींचा दबल्याने मृत्यू झाल्याची दूर्घटना घडली आहे.

धूळे रोडवरिल तालूक्यातील रणाईचे येथील शेतकरी राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यातच स्वतःची झोपडी तयार केली होती. शेतात काम करून हे कूटूंब राहात होते आज दि.१६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

या वादळात झोपडी जवळील खळ्यातील मोठे चिंचेचे झाड अचानक कोसळले. त्यात बल्लूची झोपडी दाबली जावून  यात त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला (वय१६) आणि रोशनी बारेला (वय१०) या दोन्ही सख्ख्या बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा या घटनेत मृत्यू झाला.

घटनेची खबर मिळताच गावातील सरपंच भगवान पाटील, रंगराव पाटील, गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण घर दाबले गेल्याने झाड कापून मुलींना व घरचे समान काढण्यात आले मूलींचे शव प्रा.आरोग्य केंद्रात नेण्यात आले बारेला यांचा हसता खेळत्या मूली निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com