जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील एका भागात राहणार्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्या तरुणासह त्याच्या दोन मित्रांना चंद्रपुर येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या मामासह राहते. 26 जानेवारी रोजीच्या पुर्वी दिपक उर्फ निखील किरण वाणी रा. वराडसिम ता. भुसावळ याने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पिडीत मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयित आरोपी हा कारने पिडीत मुलीला चंद्रपुर जिल्ह्यातील गेवरा ता. सावली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी तातडीने पोलीस पथकाला चंद्रपूर येथे रवाना केले होते.

पळविणार्यास मदत करणार्या दोघांना अटक

संशयित आरोपी दिपक उर्फ निखिल किरण वाणी याला गेवरा ता. सावली जि. चंद्रपूर येथून अटक केली व संशयित पिडीत मुलीला ताब्यात घेतले. दरम्यान मुलीला पळवून नेण्यासाठी मदत करणारे प्रशांत निवृत्ती खाचणे आणि कल्पेश उर्फ हर्षल हरी सुदाम वारके दोन्ही रा. वराड सिम ता. भुसावळ यांनाही सहआरोपी केले असून तिघांना अटक केली आहे.

सहआरोपी महिला सरपंचाचा पती

या प्रकरणातील संशयित सहआरोपी प्रशांत निवृत्ती खाचणे हे वराडसीम गावचे महिला सरपंचाचे पती आहे. त्याच्या ताब्यातील (एमएच 12 जीझेड 5772) वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ रतिलाल पवार, महिला पोहेकॉ मंदा बैसाने यांनी केली. तिघांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.