चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ कंन्टेनरने व दुचाकीच्या समोरा-समोरील अपघात झाला.

या अपघातात ठिंबकचे काम करणारे कजगाव पिंप्री बु.प्र.भ(ता.पाचोरा) येथील दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दि,१६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला कंन्टेनर चालका विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिवाजी पाटील(२१) व सुरेश नारायण पाटील(३६) अशी मयतांची नावे आहेत.

अक्षय शिवाजी पाटील व सुरेश नारायण पाटील हे दोघे ही रांजणगाव येथे शेतात ठिंबकचे काम करण्यासाठी आले होते. काम आटोपून ते रांजणगाव येथून चाळीसगावकडे दुचाकीने चाळीसगाव-औरंगाबाद महमार्गावरुन येत असताना, रांजणगाव फाट्याजवळ कन्नड कडुन चाळीसगावकडे येणार्या भरधाव कंन्टेनरने(एच.आर.५५,एसी१८०८) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही लांब अतंरावर फेकले गेले. त्यांना गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

कंन्टेनर चालकांनी जखमींना कुठल्याही प्रकारची मदत न करता तेथून पळ काढला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला धनराज कैलास पाटील रा.करजगव(ता.पाचोरा) यांच्या फिर्यादीवरुन कंन्टेनर चालका विरोधात भादवी कलम ३०४(अ),२७९,३३६,३३८,४२७, मो.व्ही ऍक्ट १८४,१३४ ब प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय संपत आहेर करीत आहेत.