<p><strong>अमळनेर - Amalner </strong></p><p>जिल्ह्यातील चार पोलिस पाटील यांचा मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. आपले कर्तव्य पार पाडत असताना या रोगाची लागण होऊन त्यांचा त्यात मृत्यू झाल्याने राज्य शासनातर्फे त्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.</p>.<p>निधन झालेले पोलीस पाटील हे १) उल्हास नामदेव लांडगे (वय ४८) जवखेडे, ता.अमळनेर २) विलास माणिक पाटील (वय ५०) पिंपरखेड, ता.भडगाव ३) जगदिश देवराम पाटील (वय ५९) वाघोदे बु., ता.रावेर ४) मिलिंद श्रावण गजरे (वय ६०) यावल, ता.यावल यांचा समावेश असून या मयत पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये प्रमाणे दोन कोटी इतकी रक्कम सानुग्रह सहाय्यक म्हणून प्रदान करण्यास मंजूरी मिळाली आहे.</p>