जळगाव

रेल्वेतून दोन कोटींची रोकड जप्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पवन एक्स्प्रेसमधून अपहारातील दोन कोटींची रोकड घेऊन जाणार्‍या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाने खंडव्यानजीक मुसक्या आवळल्या. रेल्वे सुरक्षा बलाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे एएससी व डीएससी यांना अपहार प्रकरणातील विनोद झा व अमित यादव हे दोघे संशयीत दोन कोटींच्या रोकडसह पवन एक्स्प्रेसने जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे डीएससी क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गाडीतील आरपीएफच्या गस्तीपथकाला संशयीतांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले तर खंडवा आरपीएफला कारवाईबाबत सूचित करण्यात आल्यानंतर गाडी खंडवा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली. आरोपींनी ही रोकड कुठून लांबवली व ते कुठे जात होते? याबाबत माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com