जुगार अड्ड्यावर धाड ; दोन जणांना अटक
जळगाव

जुगार अड्ड्यावर धाड ; दोन जणांना अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - प्रतिनिधी :

पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केट परिसरामधील जुगार अड्ड्यावर रामानंदनगर पोलिसांनी बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यांच्या जवळील 3 हजार 320 रुपये रेाख, सट्टा, जुगाराचे साहित्य पेालिसांनी जप्त केले.

पोलिसांना या जुगार अड्ड्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली. त्या ठिकाणी पोलिसांनी जनराज बन्सी भोई (वय 44, रा.गांधी चौक) आणि संभाजी श्रीपत सैंदाणे (वय 75, रा.मयूर कॉलनी) यांना अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याजवळील 3 हजार 320 रुपये, सट्टा, जुगाराचे साहित्य जप्त केले. त्यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी, विजय खैरे, भूषण पाटील, होमगार्ड तुषार नेवे यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com