एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेले आरोपी
एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेले आरोपी
जळगाव

शेतकर्‍यांची फसवणूक करणारे दोघे गजाआड

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पंधरा दिवसांत पैसे देण्याच्या बोलीवर कापूस खरेदी करणार्‍या जळगावातील तीन व्यापार्‍यांनी तालुक्यातील धानवड येथील 18 शेतकर्‍यांची 35 लाख 11 हजार 289 रुपयांची फसवणूक केली.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघं व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी प्रदीप पारधी, रा. धानोरा, ता.चोपडा व अनुप उर्फ गोलू ओमप्रकाश तिवारी रा. प्रजापत नगर, जळगाव यांना शुक्रवारी अटक केली.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सैय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.

Deshdoot
www.deshdoot.com