भुसावळ : गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
जळगाव

भुसावळ : गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

वेगवेगळ्या घटनेत पोलिसांची कारवाई

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ - Bhusawal

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने येथील नारायण नगरातील रहिवासी आकाश गणेश राजपूत यास दोन गावठी कट्टयांसह ताब्यात घेवून मुद्देमालासह त्यास बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.यातील आरोपी आकाश राजपूत हा भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. दाखल आर्म ऍक्ट मधील असल्याने सहाय्यक ङ्गौजदार अशोक महाजन, हेकॉं शरिङ्ग काझी, पोना युनूस शेख, किशोर राठोड, पोकॉ रणजीत जाधव, अरूण राजपूत या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई दि. १० जुलै रोजी रात्री केली आहे.

गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

येथील शहर पो.स्टे. चे पोनि बाबासाहेब ठोंबे यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकास घटनास्थळी पाठविले. त्यांनी सापळा रचून ७ नंबर पोलिस चौकी मागुन दि. १० रोजी रात्री ८.३० वाजता गावठी कट्ट्यासह आरोपीस पकडले. येथील ७ नंबर पोलिस चौकी मागे २२ वर्षीय युवक प्रितमसिंग जितेंद्र पाटील रा.गणराया विहार भुसावळ हा गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती पोनि बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने संजय बडगुजर, सुनिल सैंदाणे, विकास बाविस्कर, जितेंद्र सोनवणे, सुपडा पाटील, साहिल तडवी, जुबेर शेख, संजय पाटील, सोपान पाटील या पथकास घटनास्थळी रवाना केल्याने या पथकाने सापळा रचून प्रितमसिंग पाटील यास गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. त्याच्या विरोधात आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com