भुसावळ : चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक
जळगाव

भुसावळ : चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

येथील मॉडर्न रोड वरील हरी ओम इलेक्ट्रॉनिक दुकानातून दि.१७ जुलै रोजी ७.०० ते दि.१८ जुलै रोजी स. ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सुरेंद्र वालवाणी (रा.हनुमान नगर भुसावळ) यांच्या मालकीच्या दुकानाचे शटरला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करित २ लाख २६ हजार ३५० रूपये किंमतीचा माल चोरून नेला.

याबाबत दुकान मालक सुरेंद्र वालवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पो.स्टे.ला भाग ५ गु.र.नं. ७३९/२० भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोनि दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून संशयित आरोपी फिरोज शेख अकिल गवळी (वय २४, रा.जममोहल्ला, मजिद जवळ भुसावळ) व रज्जाक उर्फ राजा शेख रहीम (वय २८, रा.जाममोहल्ला भुसावळ) यांना जममोहल्ला परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, डिवायएसपी गजानन राठोड व पोनि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी, अनिल मोरे, पोना रमण सुरळकर, रविंद्र बिर्‍हाडे, पोका विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, कृष्णा देशमुख यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com