दिड वर्षापुर्वी अपहरण झालेली १३ वर्षीय ट्विंकल उत्तर प्रदेशात सापडली

उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यावल पोलिसांची यशस्वी कामगीरी
दिड वर्षापुर्वी अपहरण झालेली १३ वर्षीय ट्विंकल उत्तर प्रदेशात सापडली

अरुण पाटील / चंद्रकांत नेवे

यावल / साखळी

यावल येथील धोबीवाडा परिसरात राहणारी व मागील दीड वर्षापुर्वी शाळेतुन अपहरण करण्यात आलेल्या १३वर्षीय मुलीला उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन शोध घेऊन ताब्यात घेण्यात यावल पोलीसांना अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे यावल पोलिसांच्या कामगिरीबद्दल संपूर्ण यावल तालुक्यात उंच नव्हेतर जळगाव जिल्ह्यातून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर फिरवली जात आहे.

या संदर्भात पोलीसात भिमसिंग कोळी वय६५ वर्ष यांनी पोलीसात आपल्या मुलीची मुलगी टिंकल कोळी हीचे १९नोव्हेंबर २०१९ रोजी ति शिकत असलेल्या शाळेतुन एका अज्ञात व्याक्तीव्दारे रिक्शात बसवुन तिचे अपहरण करण्यात आले होते. याच काळात तिची आई मनिषा कोळी ही देखील सुप्रिम कॉलनी जळगाव येथे राहात असतांना तिचा शोध घेतला असता ती देखील मिळुन आली नाही दरम्यान भिमसिंग गंगाराम कोळी यांनी सर्वत्र नात ट्विंकल कोळी आणी त्यांची मुलगी मनिषा कोळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मिळुन आल्या नसल्याने निराश झालेल्या आजोबांनी त्या नातीचा व त्यांची मुलगी हिचा अखेर शोध थांबविला होता.

मात्र दीड वर्षानंतर अचानक ट्विंकल कोळी हिचा दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता आजोबांना फोन आला आणी तिने आपण कुठ आहे ही सर्व माहीती आजोबांना दिली भिमसिंग कोळी यांनी सदरची माहिती भारतीय जनता पार्टीचे यावल शहर अध्यक्ष डॉक्टर निलेश गडे यांच्या कानावर ही माहिती टाकली डॉक्टर नीलेश दगडे यांनी उत्तर प्रदेश मधील आर.एस.एस. शाखेशी संपर्क साधून सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार डॉक्टर गडी व भिमसिंग कोळी यांनी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याशी चर्चा केली सुधीर पाटील यांनी पुन्हा जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याशी सदर बाबतीत चर्चा करून यावल पोलीसां मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होताच, त्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे या दोन सदस्यांच्या पथकास गोरखपुर उतरप्रदेश येथे पाठविले सोबत भिमसिंग कोडी हेसुद्धा पोलिसांसोबत उत्तर प्रदेशात या पथकासोबत गेलेले होते या दोघ ही पोलीसांनी अखेर उत्तर प्रदेशच्या तहसील बडहलगंज जिल्हा गोरखपुर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बच्चा यादव, पोलीस कर्मचारी सुशीलकुमार यादव आणी गृहरक्षक दलाचे प्रदुमल कुमार या पोलीसांच्या मदतीने त्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा शोध लावण्यात यश मिळवले असुन, तिला त्यांनी त्याब्यात घेतले आहे.

ट्विंकल कोळी ची आई मनिषा किरण कोळी हीचा मात्र एक महीन्यापुर्वी बडलहगंज येथे रुग्णालयात उपचार घेत असतांना कोरोनामुळे मृत्यु झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com