जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील एका कर्मचार्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचे स्वीय सहायकाशी उर्मटपणे वर्तुणूक करुन अरेरावी केल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी उपाध्यक्षांसह शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, मधुकर काटे, पल्लवी सावकारे यांनी सीईओंकडे तक्रार केली असून त्या कर्मचार्याची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागातील क्लार्क गजेंद्र पाटील यांच्याकडे शाळा बांधकाम संदर्भात विचारणा करण्यासाठी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचे स्वीय सहायक विवेक अत्तरदे हे गेले असता त्या कर्मचार्याने स्वीय सहायक अत्तरदे यांच्याशी अरेरावी केल्याची घटना 18 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

तसेच कामानिमित्त आलेल्या सदस्यांना शिक्षण विभागात कर्मचारी टेबलावर नसल्याची बाब समोर आल्याने जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प.सदस्य मधुकर काटे, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, पल्लवी सावकारे यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी अचानक भेट दिली. तसेच सीईओंकडे सदस्यांनी तक्रार देवून कर्मचार्यांना शिस्त हवी, लोकप्रतिनिधीना चांगली वर्तुणूक मिळावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी यावेळी सीईओंकडे केली.

शिक्षण विभागातील कर्मचार्यांना नोटीस

यावेळी शिक्षण विभागात गैरहजर असलेल्या पाच कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. दोन परिचर आणि तीन वरिष्ठ सहायकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक अनिल सपकाळे, वरिष्ठ सहायक प्रतिभा चौधरी, वरिष्ठ सहायक जितेंद्र सोनवणे, परिचर उर्मिला खर्चे, विजया महाजन या पाच कर्मचार्यांना नोटीस बजाविण्यात आली असून अनुपस्थित असल्याबद्दल खुलासा सादर करण्याचे आदेश सीईओंनी संंबंधित कर्मचार्यांना दिले आहे.