कन्नड घाटात ट्रक कोसळला ; चालक ठार, दोघे जखमी

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
कन्नड घाटात ट्रक कोसळला ; चालक ठार, दोघे जखमी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावर कन्नड घाटात म्हसोबा मंदिराच्या पुढे ट्रक दरीत कोसळून चालक ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. चालक भीमाभाई अमरसीभाई डाबी रा. गुजरात असे मयताचे नाव आहे.

कन्नड घाटातून कडप्पा व ग्रॅनाईट घेऊन कर्नाटकहुन सुरतकडे जात असलेल्या जीजे 27/ 60 12 या क्रमांकाचा ट्रक कन्नड घाटातील मसोबा मंदिराच्या पुढे ओव्हरटेकच्या नांदत दरीत कोसळला, यात चालक भिमाबाई अमरसीभाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक मधील लालजीभाई गोवर्धन भाई सरवय्या व अजयभाई भीमाभाई डबी दोघे. रा. गुजरात हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना दि,२२ रोजी संकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com