वनविभागाकडून वनजमिनीधारकांना दिला जातोय त्रास

लोक संघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
वनविभागाकडून वनजमिनीधारकांना दिला जातोय त्रास

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी जळगाव जिल्ह्यातील वनविभागाकडून हा कायदा पायदळी तुडवला जात आहे. यात वनजमिनींवरील दावेदारांचे दावे अपिलात असतानाही त्यांच्या शेतात पिकाचे नुकसान करणे आणि त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचे काम वनविभाग करत असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे यासाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. तसेच नवसंजीवनी मिटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे रोजगार व शिक्षण याबाबत अंमलबजावणी व्हावी, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले आहे.

वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून वनजमीनधारकांना शेतीकडे जाण्यास मज्जाव करणे, खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देणे, त्यांना मारहाण करणे, शेतीतल्या पिकांचे नुकसान करणे अशा प्रकारे त्रास दिला जात आहे. तसेच जिल्ह्यातील वन हक्क कायद्याची प्रचंड पायमल्ली वन विभागाकडून केली जात आहे.

गुन्ह्यात अडकविण्याची दिली जातेय धमकी

वनविभागाकडून वनजमिनीधारकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जात आहे. तसेच त्यांना शेतात जाण्यापासून रोखले जात आहे. रोजगाराची मागणी करूनही रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यात रोजगार हमीची कामे सामुदायिक वन अधिकारात अद्याप सुरू झाली नाहीत.

पाल ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या चालकाने निमड्या येथील पेशंट ला जळगाव येथे डिलिव्हरी साठी आशा सोबत आणत असताना त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने त्या चालकाने रुग्णाला रस्त्यात उतरवून दिले होते. त्या रुग्णाच्या नाव संजावणी मध्ये तक्रार करूनही पाल येथील पेशंट अजूनही खाजगी दवाखान्यात पाठवले जात असल्याने या गंभीर बाबीची दखल घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

स्थलांतरित मजूर व आदिवासी यांनी जळगाव जिल्ह्यात रेशन कार्ड साठी अर्ज केलेले असताना अद्याप त्यांना कार्ड मिळालेले नाहीत व ज्यांना कार्ड मिळालेले नाहीत त्यांना अद्याप प्राध्यान क्रममध्ये न्याय मिळालेला नाही.

या सर्वबाबी मध्ये गांभीर्याने दखल देत न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी दिला. यावेळी सचिन धांडे, भरत कर्डिले, केशव वाघ, सोमनाथ माळी, पन्नालाल मावळे,अजय बारेला, इरफान तडवी, नूरा तडवी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com