रक्तदानातून कोरोना योध्दाला श्रध्दाजली
जळगाव

रक्तदानातून कोरोना योध्दाला श्रध्दाजली

आमदारासह पोलिसांचे रक्तदान, शिबीरात ७५ बॉटल रक्त संकलीत

Manohar Kandekar

चाळीसगाव -प्रतिनिधी chalisgao

चाळीसगाव पोलिस स्टेशनचे दिवगंत पोलीस नाईक कोरोनायोद्धा गोपाळ विठ्ठल भोई यांच्या स्मरणार्थ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस आधिकारी व कर्मचारी, महिला आदिनी शिबिरात रक्तदान करून शहीद गोपाळ भोई यांना श्रद्धांजली अर्पण केली.

रक्तदान शिबिरात एकूण ७५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिलांची उपस्थिती देखील उल्लेखनीय होती. कधीही कोणत्याही गरजुला रक्त पाहिजे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, दृष्टी फौंडेशन व लाइफ सेव्हर ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com