जखमी गायीवर पशुपापा अ‍ॅनिमल प्रोटेक्शनतर्फे उपचार

शस्त्रक्रिया करुन गो-शाळेत केले दाखल
जखमी गायीवर पशुपापा अ‍ॅनिमल प्रोटेक्शनतर्फे उपचार

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील महावीर नगर येथे एक बेवारस गाय जखमी अवस्थेत आढळली होती. गायीच्या जखमेमध्ये अक्षरक्षा किडे पडले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पशूपापा अ‍ॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेतर्फे गुरुवार, 23 सप्टेंबर रोजी महावीर नगर गाठून गायीच्या जखमेवर शस्त्रक्रिया करण्यात येवून औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर गायीला जळगाव शहरातील पांझरापोळ गोशाळेत दाखलही करण्यात आले.

पशू पापा संस्था प्राण्यांच्या हितासाठी अग्रेसर

जळगावातील महावीर नगर या ठिकाणी एक गाय जखमी अवस्थेत मिळून आली जिचं शिंग मुळापासून निघालेलं होतं व त्या जखमेमध्ये अक्षरशा किडे पडले होते. आढळलेली गाय बेवारस असून तिथल्या काही रहिवाशांनी पशु पापा संस्थेच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून गाय बद्दल ची संपूर्ण माहिती सांगितली. काही वेळातच महावीर नगरात पशु पापाची संपूर्ण टीम पोहोचली.

गायीच वजन तब्बल दीडशे ते दोनशे किलो होतं आणि ती सहजासहजी हातात मिळत नव्हती परंतु तिच्यावर उपचार करणं हे ही तितकेच गरजेचे होतं. नाहीतर शिंगांच्या जागेवर झालेलं ते इन्फेक्शन तिच्या मेंदूपर्यंत पोचायला वेळ लागला नसता म्हणून पशु पापाच्या पूर्ण टीमने तारेवरची कसरत करून कसंतरी गाईला उपचारासाठी पकडलं व जागेवरच जखम साफ केली जखमीमध्ये झालेले किडे देखील बाहेर काढलेत व जखम मोठी असल्याकारणाने गाईला टाके देखील लावावे लागले. हा सगळा उपचार डॉ. पंकज राजपूत व टीमने जागेवरच केला.

गाईला पुढचे दहा ते पंधरा दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणं गरजेचं होतं म्हणून खाजगी वाहनातून गाईला पांझरापोळ गोशाळेत हलवण्यात आले. गाईचे टाके काढल्यानंतर तिच्यावर पुढचा उपचार देखील करण्याची तयारी पशु पापाच्या संपूर्ण टीमने दाखवलेली आहे.

गायीच्या उपचारासाठी यांनी घेतले परिश्रम : डॉ.पंकज राजपूत यांच्यासह पशुपापा संस्थेचे भवानी अग्रवाल, हर्षल भाटिया, अनुज अग्रवाल, दर्शन भावसार, श्रेयस सोरडे, ऋषिता वारुळे, तनय जाधव, सागर करडा, विशाल रागवलानि, हृषिकेश रावेरकर, ऋषिकेश देशमुख यांनी परिश्रम घेतले

Related Stories

No stories found.