अत्यावश्यक कारणाशिवाय केलेला प्रवास ठरणार दंडनीय अपराध

जिल्ह्यात तपासणीसाठी पथके कार्यरत
अत्यावश्यक कारणाशिवाय केलेला प्रवास ठरणार दंडनीय अपराध

जळगाव - Jalgaon

ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने दिनांक 21 एप्रिल, 2021 रोजी जाहिर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास करण्याची मुभा नाही. त्यासाठी परवानगी पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केला जात नाही

नियमावलीत नमूद नियमांचे पालन न करता केलेला प्रवास हा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडनीय अपराध असून याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिल, 2021 रोजी रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे असून ती 1 मे 2021 रोजी सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे.

नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवास जसे वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे. या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही परवानगी, पासची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com