गुटखा
गुटखा
जळगाव

कुरकुऱ्याच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक

अमळनेरच्या व्यापाऱ्याचा सहभाग

Rajendra Patil

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

कुरकुरे वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणाऱ्या धरणगाव येथील घटनेत अमळनेरच्या व्यापाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी धरणगाव येथे हि कार्यवाही पोलीसांनी केली होती.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व धरणगाव पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई केली होती. आता अमळनेरचा गूटखा किंगचा पोलीस शोध घेत आहेत. यात ट्रक व नऊ लाखाचा गुटखा असा सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ट्रक चालकास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर एका संशयिताचा शोध सुरू आहे.

धरणगावमार्गे गुटख्याचा ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी धरणगाव येथे रेल्वे उड्डाणपूलाजवळ एक ट्रक क्र. एम.एच.०३, सी.पी.१९४३ हा चौकशीसाठी अडवला असता त्यात वरील बाजूस कुरकुरे गोणी व आतील बाजूस विमल व गोवा कंपनीचा गुटखा गोणी ठेऊन वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. ट्रक चालक मेहराज रहमुल्ला अहमद (वय ३८) याच्याकडे चौकशी केली असता सदर माल

अमळनेर येथील व्यापारी प्रकाश वासवानी यांचा असल्याचे त्याने सांगितले, पोलीस तपासात उघडकीस आले. गुटख्याचे अमळनेर कनेक्शन आहे. पोलीसांनी केलेल्या चौकशीत गुटखा व्यापा-यावर "प्रकाश" पडला आणि गुटख्याचे अमळनेर कनेक्शन उघडकीस आले आहे. सदर गुटखा व्यापा-याच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अमळनेर येथे येऊन गेले या प्रकरणातील दुसरा संशयित असलेला गुटखा व्यापारी प्रकाश वासवानी हा पसार होण्यात यशस्वी झाला. या पथकाने केली कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सपोनि नारायण पाटील, अशोक महाजन, रामचंद्र बोरसे, रविंद्र घुगे, मनोज दुसाने, रामकृष्ण पाटील, प्रविण हिवराळे, दिपक शिंदे, परेश महाजन, महेश पाटील, दादाभाऊ पाटील यांच्या पथकाने धरणगाव पोलीसांसह कारवाई केली आहे.

यात ८ लाख ९३ हजार २८० रूपयांचा माल व अंदाजे १० लाख रूपयांचा ट्रक असा सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.हे.कॉ.मनोज दुसाने यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सपोनि पवन देसले हे पुढील तपास करीत आहेत. आज ट्रक चालकास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या घटनेतील फरार संशयित आरोपी प्रकाश वासवानी याचा शोध सुरू आहे

Deshdoot
www.deshdoot.com