जिल्हा परिषदेच्या 127 कर्मचार्‍यांच्या बदल्या
जळगाव

जिल्हा परिषदेच्या 127 कर्मचार्‍यांच्या बदल्या

जागेवरच बदल्यांची केली ऑर्डर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग वगळता सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, अर्थ विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यासह 10 विभागाच्या प्रशासकीय आणि विनंतीवरुन ऑफलाइन बदल्याची प्रक्रिया मंगळवारी छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली.

किरकोळ गोंधळ वगळता सामान्य प्रशासन विभागासह विविध विभागाच्या 127 कर्मचार्‍यांच्या पहिल्याच दिवशी बदल्या करण्यात आल्या. जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, सीईओ डॉ.बी.एन. पाटील, अतिरीक्त सीईओ विनोद गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, प्रभारी डीएचओ डॉ.पांढरे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

शासनाच्या नियमानुसार प्रशासकीय 10 टक्ेक तर विनंती 5 टक्के बदल्यांचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रशासकीय आणि विनंतीवरुन ऑफलाइन बदल्यांना सुरुवात झाली. सकाळी 10 ते 5.25 वाजेदरम्यान दोन सत्रात या बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीली.

सर्वप्रथम सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी 1 प्रशासकीय व 1 विनंती बदली करण्यात आली.विनंतीवरुन कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1, विस्तार अधिकारी 1 प्रशासकीय, वरिष्ठ सहाय्यक (लि.व.) प्रशासकीय 3 तर विनंती 5, कनिष्ठ सहाय्यक (लि.व.) प्रशासकीय 9 तर विनंती 13, परिचरमधून विनंती 8 बदल्या करण्यात आल्या.

ग्रामीण पाणीपुरवठा

पा.पू विभागातील कनिष्ठ अभियंता विनंती एक तर पशुसंवर्धन विभागातील पशूधन पर्यवेक्षक प्रशासकीय एक तर विनंती एक, व्रणोपचारक विनंती एक, तर शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी प्रशासकीय एक तर विनंती एक,बांधकाम कनिष्ठ अभियंता प्रशासकीय पाच तर विनंती चार, स्थापत्य अभियंता पाच तर सिंचन कनिष्ठ अभियंता 3 बदल्या झाल्या.

पारदर्शकपणे बदल्या

शासन नियमाप्रमाणे कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाव्दारे बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये पारदर्शकपणा राखला गेला असल्याची माहिती जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली. कर्मचार्‍यांची गैरसोय टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून ऑफलाईन बदल्यांमध्ये पारदर्शकतासुध्दा आहे.

ग्रा.पं., अर्थ, महिला बालकल्याण विभागाचा समावेश

ग्रामपंचायत विभागातील ग्रामविकास अधिकारी प्रशासकीय 2 तर विनंती 7 , विस्तार अधिकारी विनंती 1, ग्रामसेवक प्रशासकीय 15 तर विनंती 25 कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यात. अर्थ विभागातील सहाय्यक लेखाधिकारी प्रशासकीय 2,वरिष्ठ सहाय्यक प्रशासकीय 2, कनिष्ठ सहाय्यक प्रशासकीय 1 तर विनंती 1 अशी बदली झाली. महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका विनंती वरुन तीन बदल्या झाल्या. तर कृषी विभागातील विस्तार अधिकारी विनंतीवरुन एक बदली झाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com