चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील उपखेड शिवारात अवैद्य वाहतुक करणारे ट्रॅक्टर महसूल प्रशासनाच्या पथकाने पकडले, परंतू अंधाराचा फायदा घेवून वाळू भरलेले ट्रॅक्टर पळून नेण्यात चालक यशस्वी झाला. याप्रकरणी चाळीसगाव मेहुणबारे पोलीस स्टेशनला चालक व मालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना दि,७ रेज रात्री १० वाजेच्या सुमारास गुप्त माहिती दिली की, उपखेड येथील ग्रा.सदस्य संजय साहेबराव मगर व माजी उपसरपंच संदिप विक्रम पाटील यांनी उपखेड शिवरात शाकिनालाच्या काढावर वाळूने भरलेले ट्रॅक्टर, ट्रॉली पकडले आहे.

त्यानतंर विशाल सोनवणे, मंडळ आधिकारी योगेश प्रकाश सोनवणे, तलाठी गणेश गढरी, तलाठी आनंद शिंदे आदिचे पथक शाकिनालाच्या काठावर पोहचले, याठिकाणी एक विनाक्रमांकाचे लाल रंगाचे ट्रॅक्टर व वाळू भरलेली ट्रॉली दिसली. यावेळी पथकाने चालकास विचारांना केली असता, तेथून त्यांने काही एक उत्तर न देता ट्रॅक्टरसह पळ काढला. पथकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

परंतू नाल्याला पाणी असल्याने, ट्रॅक्टरला पकडणे शक्य झाले नाही. त्यानतंर पथकाने ट्रॅक्टरबाबत माहिती जानून घेतली असता, ते आनंद तुकाराम मगर रा.उपखेड व महेश देसले रा.देवघट ता.मालेगांव यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या फिर्यांदीवरुन अज्ञात ट्रॅक्टर चालक व व मालक आनंद तुकाराम मगर, महेश देसले यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.