निंबाचे झाड कोसळल्याने ट्रॅक्टरचे नुकसान

सुदैवाने जीवितहानी टळली
निंबाचे झाड कोसळल्याने ट्रॅक्टरचे नुकसान

यावल (प्रतिनिधी) - Yawal

तालुक्यातील थोरगव्हाण येथे मध्य चौकातील अरुण अमृत चौधरी व गुलाब अमृत चौधरी यांच्या घराजवळील निंबाचे जुन झाड अचानक कोसळून त्याठिकाणी ट्रॅक्टर दाबले गेल्याने मोठे नुकसान झाले.

मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही

थोरगव्हाण तालुका यावल येथील अरुण अमृत चौधरी यांचे मालकीची महेंद्रा एम एच 1 9-96 38 या ट्रॅक्टर वर अचानक निंबाचे झाड दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यात ट्रॅक्टर दाबले जाऊन ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने याठिकाणी जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे थोरगव्हाण मध्ये एकच यावेळी भीतीचे वातावरण निर्माण झाले आजूबाजूला मध्ये वस्तीमध्ये अनेक घरं होती दुपारच्यावेळी तरुण व वृद्ध या झाडाखाली सावलीत बसत. त्यांनी पलायन केले अन्यथा हे तिघे चौघेजण दाबले गेले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com