भुसावळ । प्रतिनिधी Bhusawal

लग्नाचे अमिष दाखवून गेल्या पाचवर्षापासून सातत्याने अत्याचार केले व 2 आक्टोबरपासून तालुक्यातील भानखेडा येथील संबंधित युवक बेपत्ता झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे पिडीतेच्या लक्षात येताच शहर पोलिसात युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नारायण नगर, वल्लभ नगरातील 29 वर्षिय महिलेला 1 जानेवारी 2015 ते 2 ऑक्टोबर 2020 दरम्यान राम सदाशिव सपकाळे (रा. भानखेडा ता. भुसावळ) याने लग्नाचे अमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारिरिक संबंध ठेवले व 2 ऑक्टोबर पासून संबंधित युवक बेपत्ता झाला.

त्यानंतर त्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पिडितेने युवका विरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिल्यावरुन गु.रं.न.24/20, भा.दं.वि, 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.नि. बाळासाहेब ठोंबे करित आहे.

दरम्यान, घटनास्थळी डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे, पो.नि. बाबासाहेब ठोंबे, सपोनि संदीप दुनगहु यांनी भेट दिली.