अरे देवा ...तब्बल ३१६ रुग्ण पॉझिटिव्ह
जळगाव

अरे देवा ...तब्बल ३१६ रुग्ण पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

लॉकडाऊनचा आठवडाभराचा कालावधी संपूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास तयार नाही. गुरुवारी तर ट्रिपल सेंचूरी होत एकाच दिवसात 316 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 93, जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 44, अमळनेर 15, चोपडा 8, पाचोरा 6, भडगाव 2, धरणगाव 14, यावल 4, एरंडोल 26, जामनेर 17, रावेर 23, पारोळा 3, चाळीसगाव 15, मुक्ताईनगर 25, बोदवड 1 असे आढळून आले आहेत.

गुरुवारी एकूण 227 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पर्यंत जिल्ह्यात 358 कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2377 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यापैकी 204 रुग्ण अत्यवस्थ आहेत.

गुरुवारी मृत्यू झालेल्यांमध्ये 4 जणांचा मृत्यू जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात तर दोघांचा मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झालेला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 72 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, भडगाव तालुक्यातील 55 वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यातील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com