चाळीसगाव : दोघांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगाव : दोघांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

संपर्कातील १० जणांना केले क्वॉरंटाईन

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव पुन्हा दोघांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात शहरातील काल मयत झालेल्या वृध्दाचा करोना देखील अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील पिलखोड येथील एक पुरुषाला कोरोनाची बांधा झाल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.

वृध्द हा हद्यविकाराने मयत झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतू आज त्याच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, त्याचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे सिद्ध होत आहे.

करोना बाधित दोघांचा संपर्कातील जवळपास १० ते १५ जणांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यांचे स्वॅब घेवून ते जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे.

तसेच पॉझिटिव्ह आढळलेल्या मयत व रुग्णाच्या घराचा परिसर हा कनटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असून घटनास्थळी प्रशासनाचे पथक दाखल झाले आहे.

दरम्यान शहरासह तालुक्यात वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय असून नागरिकांनी खबदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com