बोरघाटात पट्टेदार वाघाचे दर्शन

बोरघाटात पट्टेदार वाघाचे दर्शन

पाल ता.रावेर ।

पालच्या बोरघाटात सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. पालच्या कॅरिडॉरमध्ये पट्टेदार वाघाचे वास्तव्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे.

येथील चैतन्य गॅस एजन्सीचे संचालक लालचंद चव्हाण व त्याचे सहकारी जितू छगन बुंकर हे जळगाव येथून बोरघाटमार्गे पाल येथे येत असतांना यू-टर्न वळणावर भररस्त्यावर पट्टेदार वाघ मुक्तसंचार करत असतांना दिसला, पट्टेदार वाघाला पाहून चव्हाण घाबरून गेले. त्यांनी गाडीचे सर्व काच बंद करून, मोबाईलमध्ये वाघाचे फोटो घेतले.

पाल भागात पट्टेदार वाघ असल्याचे अनेकदा पायाची ठसे व शिकारीवरून खात्री होत होती. मात्र ठोस माहिती हाती लागली नव्हती, आजच्या घटनेने पाल अभयारण्य वाघाच्या अस्तित्वासाठी पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे.वन्यप्रेमीसाठी ही अत्यंत आनंददायी बाब आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com