जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील एका भागात राहणारी विवाहितेला कोल्ड्रींगमध्ये काही तरी देवून तिची शुध्द हरपल्यावर विवाहितेवर तिच्या संमतीविना अत्याचार केला.

यानंतर अत्याचार करतांनाचे फोटो, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यासह पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारण्याची तसेच आत्महत्येची धमकी देवून 2017 ते 2020 सलग तीन वर्ष विवहितेवर वेळावेळी विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार करणार्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निंभोरा येथील शाखेच्या बँक मॅनेजर अशोकनाथ सिताराम शर्मा रा. जयश्री अपार्टमेंट नवीमुंबई वुलवे याच्या विरोधात आज सोमवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, 38 वर्षीय पिडीता ही एक जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. तिला दोन मुले असून सद्यस्थितीत घटस्फोट झाल्याने विवाहिता मुलांसह माहेरी राहत आहे. घटस्फोट होण्याआधी सप्टेंबर 2017 मध्ये विवाहिता ही तिच्या मैत्रिणीसोबत पंतप्रधान योजनेतील कर्ज संदर्भात प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शिवकॉलनी येथील स्टेट बॅक कॉलनीच्या शाखेत गेली होती.

याठिकाणी बॅकेचे मॅनेजर अशोकनाथ सिताराम शर्मा यांच्यासोबत पिडीतेची भेट झाली. शर्मा यांनी पिडीतेचा मोबाईल नंबर घेतला. मोबाईलवर विवाहितेला मेसेज येवू लागले. लोनसंदर्भात सुटीच्या दिवशी बॅकेत गर्दी नसते, त्यावेळी बँकेत या असे शर्मा याने पिडीतेला मोबाईलवर संपर्क साधून सांगितले.

त्यानुसार पिडीता सुटीच्या दिवशी बँकेत गेली असता, शर्मा याने पिडीतेला पिण्यासाठी कोल्ड्रिंग दिले. शर्मावर विश्वास ठेवून पिडीतेने कोल्ड्रींग पिले. कोल्ड्रिंग पिता पिडितेला काहीच उमजत नव्हते, तिची अर्ध शुध्द हरपली. याची संधी साधून शर्मा याने पिडीतेवर तिच्या संमतीविना शारिरीक अत्याचार केला. याचवेळी शर्मा याने अत्याचार करतांनाचे फोटो व व्हिडीओ क्लिप तयार केली.

मुंबईला भाड्याने घर घेवून दिले

जानेवारी 2019 शर्माने पिडीतेला नवीमुंबई येथे भाड्याने घर घेवून दिले. तसेच जानेवारी 2019 ते मार्च 2020 पावतो वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले. यानंतर शर्माने पिडीतेच्या पतीला भडकाविले, व यानंतर पिडीतेने घटस्फोट घेतला. शर्मा सोबत पिडीतेचे कायदेशीर लग्न झालेेले नव्हते. एप्रिल 2020 मध्ये शर्मा याचा घटस्फोट झालेला नसल्याचे पिडीतेला कळाले. तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पिडीतेने शर्माच्या नातेवाईकांशी भेट घेतली असता, कोणीही पिडीतेचे एैकून घेतले नाही. यानंतर उलट शर्माने माझ्या कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, तुला संपवून ठाकेन, तुला खोट्या केसमध्ये अडकविन अशा धमक्या पिडीतेला दिल्या तसेच त्याच्यागावाकडील गुंड मित्र दुर्गादास यानेही पिडीतेला अश्लिल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. शर्माने मित्र दुर्गादासलाही पिडीतेचे अश्लिल फोटो व व्हिडीओ पाठविले. अशा आशयाच्या तक्रारीवरुन सद्यस्थितीत अशोकनाथ शर्मा याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपअधीक्षक करीत आहे.

घटस्फोटाचे सांगून लग्नाचे आमिष

पतीला माहिती पडले तर तो जीवंत सोडणार नाही, तर दुसरीकडे शर्मा हा अत्याचाराचे व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल करण्यासह पोलिसात तक्रार दिली तर जीवे ठार मारेन, आत्महत्या करुन घेईन अशी धमकी देत होता. यानंतरही अशाचप्रकारे धमकी देवून शर्मा याने पिडीतेवर नाशिक येथील एका हॉटेलच्या लॉजवर अत्याचार केले. यानंतर शर्मा याने माझाही घटस्फोट झाला असल्याचे पिडीतेला सांगितले तसेच तु मला खूप आवडते, तुला कोणत्याही गोष्टीशी कमतरता भासू देणार नाही, तु सुध्दा पतीसोबत घटस्फोट घे, मी तुझ्या सोबत लग्न करेन अशा भूलथापा दिल्या. व्हिडीओ क्लिप शर्माकडे असल्याने पिडीता त्याच्या दबावाला बळी पडून त्याने सांगितल्यानुसार गोष्टी करण्यास तयार झाली. व तो सांगेन तसे वागू लागली.