मेहुणबारे परिसरातून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक्टर जप्त
जळगाव

मेहुणबारे परिसरातून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक्टर जप्त

गिरणा नदी पात्रातून अवैद्यरित्या वाळू वाहतुक

Manohar Kandekar

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यातील मेहुणबारे परिसरातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुक करणारे तीन ट्रक्टर महसुल विभागाच्या पथकाने पकडले आहेत. तालुक्यातील रहिपुरी येथे महसुल विभागाच्या पथकाने दि,.२२ जुलै रोजी अवैध वाळू वाहतूक करत असलेले एक ट्रॅक्टर पकडून मेहुनणबारे पोलीस स्टेशनला जमा केले.

पथकात तलाठी बी.ए.चव्हाण, डी एस चव्हाण, निलेश अहिरे, गणेश गढरीव कोतवाल ऋषीकेश सूर्यवंशी आदी समावेश होता. तर दि.२३ रोजी भोरस जवळ अवैध वाळू वाहतूक करताना सचिन फुलवारी यांचे एक ट्रॅक्टर पथकाने जप्त केले.

तालुक्यातील खरजई येथे विशाल बीड रा.रहीपुरी याचे मालकीचे एक ट्रॅक्टर जप्त केले. या पथकात एस.पी.बच्छाव तलाठी दिनेश येडे, प्रविन महाजन, रविकांत भामरे आदिचा समावेश होता. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरांवर दंडात्मक कारवाई किवा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com