सातव्या वेतन आयोगासाठी मनपा प्रशासनाची डोकेदुखी

नियमांच्या पुर्ततेसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत
सातव्या वेतन आयोगासाठी मनपा प्रशासनाची डोकेदुखी
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon :

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.मात्र लागू करतांना काही अटी-शर्ती घालण्यात आल्यामुळे कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करतांना प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान,अर्टी-शर्तीची पुर्तता करण्यासाठी अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार यांची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.संबंधित समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त संतीश कुलकर्णी यांनी दिले आहे.

मनपाला लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्त सतीश कुलकर्णी , अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, श्याम गोसावी, मुख्य लेखा परिक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग लागू करतांना शासनाने ज्या अटी-शर्ती निश्‍चित केल्यायाबाबत चर्चा झाली. तसेच लागू केल्यानंतर वेतनापोटी दरमहा अतिरिक्त किती भार पडणार आहे.

२०१६ ते २०२० पर्यंत फरकांची रक्कम जवळपास ७० ते ८० कोटी अपेक्षित आहे. फरकाची रक्कम देतांना पाच टप्प्यात कशी दिली जाईल याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

समितीत यांचा आहे समावेश

अटी व शर्थींची पुर्तता होईल की नाही, यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना या अनुषंगाने आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. यात अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार यांचा समावेश आहे.महसुली उत्पन्नाबाबत काय उपाययोजना कराव्यात याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

मालमत्ता कर वसुलीवर भर देणे अपेक्षित

शासनाने घालून दिलेल्या प्रमुख अटी व शर्थींमध्ये मालमत्ताकराची वसुली १०० टक्के करण्याबरोबरच मनपाच्या अस्थापना खर्च ३५ टक्के इतका असणे गरजेचे आहे. मात्र, सध्यस्थितीत मनपा अस्थापना खर्च हा ५१ टक्के असल्याने खर्च कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाला खर्चावर नियंत्रण आणावे लागणार आहे. मनपाचा अस्थापना खर्च शासनाने निश्चित करून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक आहे. यावर मनपा प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे आता मनपा कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com