सांडपाण्याच्या टाकीत बुडून तिघांचा मृत्यू

सांडपाण्याच्या टाकीत बुडून तिघांचा मृत्यू

जळगावातील जुन्या औद्योगिक वसाहतीतील समृद्धी केमिकल्स कंपनीततील घटना

जळगाव - Jalgaon

शहरातील जुन्या औद्योगिक वसाहतीतील अयोध्यानगर येथील समृध्दी केमिकल्स या कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून एका पाठोपाठ दोन कामगार व एक ठेकेदार असा तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन कोळी (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर) अशी मृतांची नावे आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंठा चौफुलीला लागूनच असलेल्या आयोध्यानगर रस्त्यावरील जुन्या एमआयडीसीतील ए सेक्टरमध्ये प्लॉट क्र्. ८४,८५ मध्ये सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मिती करण्याची कंपनी आहे. अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर ही कंपनी आहे. यात २० ते २५ मजूर रोजंदारीवर कामाला आहेत. शनिवारी कंपनीला सुट्टी असल्याने मालक सुबोध चौधरी यांनी मयूर विजय सोनार व दिलीप सोनार यांना कंपनीचे वेस्टेज केमिकल्स व सांडपाणी साठवण्याची टाकी साफसफाई करण्यास सांगितले होते.

अवघ्या दहा मिनिटात तिघे बुडाले

या टाकीत केमिकल मिश्रित चिखल व गाळ होता. टाकीत साफसफाई करीत असताना दिलीप सोनार यांचा वरुन पाय घसरला व ते या सांडपाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच रवींद्र कोळी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. टाकीतून हात धरून ओढत असताना कोळी हेच खाली खेचले गेले व त्यामुळे ते देखील टाकीत बुडाले. हे पाहून मयूर याने धाव घेतली व दोघांना वाचवण्यात तोही टाकीत बुडाला. अवघ्या दहा मिनिटात तिघे या टाकीत बुडाले. इतर कामगारांनी तातडीने धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. मालवाहू टेम्पो मधून जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com