एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार तिघं आरोपींना अटक
जळगाव

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार तिघं आरोपींना अटक

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी

कोम्बींग ऑपरेशन राबवत असताना एमआयडीसी पोलिसांनी हद्दपारमधील तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले. यात हद्दपार असलेले मोनूसिंग जगदीशसिंग बावरी (वय २३, रा.शिकलकरवाडा, शिरसोली नाका), रिजवान शेख ऊर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय २२, रा.अजमेरी गल्ली, तांबापूर) हे त्यांच्याच घरात पोलिसांना आढळले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अफजलखान ऊर्फ फावड्या रशीद खान (वय २४, रा.शाहूवालीया मशीद समोरील परिसर) हा रात्रीच्या वेळी मेहरुणमधील स्मशानभूमीजवळ चेहरा झाकून एखाद्या दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरताना पोलिसांना आढळला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १२२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३५ हिस्ट्रीशीटर, १५ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, नाईक नितीन पाटील, सचिन मुंढे, दीपक चौधऱी, मुद्दसर काझी, कॉन्स्टेबल सतीश गर्जे, किशोर बडगुजर, सचिन पाटील, योगेश बारी आदींनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com