कंपनीच्या तिघा मालकांना १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

कामगारांसह ठेकेदाराचे मृत्यूप्रकरण ; कंपनीचे उत्पादन थांबविले
कंपनीच्या तिघा मालकांना १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव -Jalgaon

शहरातील जुन्या औद्योगिक वसाहतीतील अयोध्यानगर येथील समृध्दी केमिकल्स या कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकीत कंपनीच्या दोघा कामगारांसह ठेकेदाराच्या बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात कंपनीचे मालक सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना आज सोमवारी जिल्हा न्यायालयाने १८ मे पर्यंत एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील जुन्या औद्योगिक वसाहतीतील अयोध्यानगर येथील समृध्दी केमिकल्स या कंपनीत सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन सोनार (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर) या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.

एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या चौकशीत करत घटनेचे प्रत्यक्षदर्शी इतर कामगारांचे जबाब नोंदविले होेते. संबंधित केमिकलचे सांडपाणी असलेल्या चेंबरमध्ये विषारी वायु तयार होतो. हे माहित असतांनाही कंपनीच्या मालकांनी कुठलेही सुरक्षेची उपाययोजना न करता, तसेच टाकी स्वच्छ करणार्या कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही कपडे अथवा साहित्य न देता चेंबरमध्ये उतरविले. व त्यात त्यांचा मृत्यू झाला असे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमरास सुबोध सुधाकर चौधरी, हिरा सुबोध चौधरी, अपर्णा सुयोग चौधरी, सुुनील सुधाकर चौधरी, सुयोग सुधाकर चौधरी सर्व रा. सागर नगर, एमआयडीसी, या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना काल रविवारी अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com