चाळीसगाव : मोटरसायकली चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक ; २४ मोटारसायकली जप्त
जळगाव

चाळीसगाव : मोटरसायकली चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक ; २४ मोटारसायकली जप्त

ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

Rajendra Patil

मोटारसायकलची ओळख पटविण्याचे आवाहन

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव, मालेगाव, धुळे व इतर ठिकाणाहुन मोटारसायकल चोरुन त्या विक्री करणार्‍या तीन अट्टल मोटारसायंकल चोरट्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २४ मोटारसायकल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी विवेक शिवाजी महाले रा.बहाळ याच्या कडुन आठ मोटारसायकली, दुसरा आरोपी ईश्‍वर शिवलाल भोई रा.बहाळ याच्याकडून सात मोटारसायकली, तर तिसरा आरोपी आकाश ज्ञानेश्‍वर महाले याच्याकडून नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या २४ मोटारसायकलची किंमत ११ लाख ४० हजार रुपये आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुप्त पध्दतीने हि यशस्वी कामगिरी केल्यामुळे पो.नि.प्रताप शिकारे व त्यांच्या पथकाने कौतूक होत आहे. अटकेतील चोरट्यांकडून इतर गुन्हांची देखील उकल होण्याची शक्यता आहे. तसेच जप्त केलेल्या मोटारसायंकलची ओखळपटविण्याचे आवाहन पोलिसांतर्फे ज्याच्या मोटारसायंकल चोरी गेलेले आहेत, त्याना केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com