जळगाव कारागृहातून तीन आरोपी फरार
जळगाव

जळगाव कारागृहातून तीन आरोपी फरार

एलसीबी पथकाने केली अटक

Rajendra Patil

जळगाव : Jalgaon

जिल्हा कारागृहातून सुरक्षा रक्षकांना पिस्तुलचा धाक दाखवून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी 7.30 वाजता घडली. यात सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड'अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत.

सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती. या प्रकरणा नंतर मोठी खळबळ माजली आहे .भल्या पहाटे सिनेस्टाईल झालेल्या या घटनेमुळे जळगावात मोठा थरार उडाला आहे

Deshdoot
www.deshdoot.com